अध्यात्मातील सूक्ष्म संकल्पना समजून घेण्याची तळमळ, त्यासाठी लागणारी चिकाटी, ह्या संकल्पना जीवनात उतरवण्याविषयी प्रामाणिक धडपड, पूर्ण श्रद्धा याद्वारे प्राप्त होणाऱ्या अनमोल अनुभूतीजन्य ज्ञानाचा सेवाभावनेने सहयोग साधण्यासाठी लेखिकेने केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. हे पुस्तक म्हणजे या सर्व गुणांचा अविष्कार आहे.